उपक्रम
औरंगाबादचे विशेष पो.महानिरीक्षक के.एम.प्रसन्नांनी पोलिसदलात आणला नवा 'कन्सेप्ट'
पोलिस आपला मित्र यासारखे जनता आणि पोलिस यांच्यात संवाद वाढविण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, ते सारे प्रयत्न केवळ कागदावरच राहिले. त्यातून पोलिसदलाची कामगिरी कधीच उजळून निघालेली नाही. याची नेमकी कारण काय आहेत हे जाणून घेऊन प्रयत्न करण्याचा निश्चय औरंगाबाद विभागाचे विशेष पोलिस मल्लीकार्जुन प्रसन्ना यांनी केला. आणि गेल्या वर्षभरात के.एम.प्रसन्ना यांच्या प्रयत्नांना औरंगाबाद विभागातील बीड, जालना, उस्मानाबाद, औरंगाबाद ग्रामीण या जिल्ह्यांतील पोलिस स्टेशन तीतली कामकाजाची कार्यपद्धती, कर्तव्यदक्षता आणि तात्काळ सर्वसामान्यांचे समाधान देण्याचा प्रयत्न होत आहे.
औरंगाबादचे आताचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. प्रसन्ना यांनी सिंधुदुर्ग, सातारा पोलिस अधिक्षक, मुंबईत आणि नागपूर पोलिस उपमहानिरीक्षक येथे काम केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणून के.एम.प्रसन्ना यांनी कर्तव्यदक्षतेने केलेली कामगिरी आजही सिंधुदुर्ग विसरलेला नाही. पोलिसदलातील 'सिंघम' ही त्यांची इमेज कायम राहिली. मात्र, पोलिस दलात काम करताना जो सर्वच कामाचा भाग असलेला कॉन्स्टेबल नेहमीच उपेक्षित राहिला आहे. हे त्यांना उमगले. यात हिंदुस्थान काँप्युटर लिमिटेडचे माजी मुख्यकार्यकारी अधिकारी विनित नायर यांच्या 'इम्प्लॉइज फर्स्ट कस्टमर सेकंड' या पुस्तकातून श्री. प्रसन्ना यांना प्रेरणा मिळाली. पोलिस लोकाभिमुखही नाहीत आणि पोलिसभिमुखही नाहीत हे जाणवत असल्याने कार्यपद्धती बदलली पाहिजे हे केवळ ठरवून आणि बोलून होणारे नाही. त्यासाठी वरिष्ठ अधिकारी, सहकारी अधिकारी, पोलिस कर्मचारी या सर्वांचा सहभाग घेत औरंगाबाद पोलिस स्टेशनचा चेहरा मोहराच बदलून टाकला. औरंगाबाद परिक्षेत्रातील ८७ पोलिस स्टेशन इमारतींचा रंग एकच आहे.
हा बदल करताना १९५७ पासून २०२० पर्यंत साहित्य, दस्त(कागदपत्र) विविध प्रकरणातील जप्त केलेला मुद्देमाल यांची विल्हेवाट लावण्यात आली. पोलिस स्टेशन आवारातील वर्षानुवर्षे सडत असलेल्या गाड्याही निर्लेखित करण्यात आल्या हे सर्व पोलिस स्टेशन कार्यालयांमध्ये अंतरबाह्य बदल करत असतानाच पोलिस दलातील कामकाजाचा भाग असलेल्या सर्व बाबतील बदल घडविण्यात आले. कामाचे वाटपही समप्रमाणात करण्यात आले. अमंलदारांना गार्ड ड्युटी, हजेरी मेजर, गुन्हे लेखनिक, सीसीटीएनएस मोहरील, वायरलेस, गोपनिय शाखा, बारनिशी या सर्वच कामकाजात सर्व अमंलदारांचा (कॉन्स्टेबलांचा) सहभाग असायला हवा ही नवी कार्यपद्धती आणली गेली. याचे कारण जालना जिल्ह्यातील एका वर्षभरात एकाच हवालदारांने ७५ प्रकरणांचा तपास केला. जो काम करतोय तो करतो नाहीतर काहींना काहीच काम नाही हे बंद करण्यासाठी कामाचे समानवाटप आणि त्या-त्या पोलिस स्टेशनच्या सर्वांनाच सर्व कामाची माहिती असावी असाही प्रयत्न होत आहे. महिला पोलिस कॉन्स्टेबललाही सर्व कामकाजात सहभागी करून घेतले गेल्याने सहाजिकच महिला पोलिसांमध्येही विश्वासाची भावना निर्माण झाली.
पोलिस दलातील या बदलामागे एनआयए नवीदिल्लीचे सहसंचालक राजकुमार व्हटकर, सहपोलिस आयुक्त प्रशासन अनिता मुंज, अप्पर पोलिस महासंचालक पंजाब या सर्वांच्या संवादातून श्री. प्रसन्ना यांना यात बदल करावासा वाटला आणि मग त्यासाठी मागे वळून न बघता पोलिस दलातील कॉन्स्टेबलला केंद्रस्थानी ठेवून नवीन कार्यपद्धती अमलात आणण्यात आली. आपण पोलिस दलातील या व्यवस्थेचा भाग आहोत हा विचार कॉन्स्टेबलच्या मनात रूचला पाहिजे. केवळ आपण हुकमाचे काबील नसून निर्णय प्रक्रियेतीलही महत्वाचे भाग आहोत ही विश्वासाची भावना कॉन्स्टेबलच्या मनात रूचली जात आहे. औरंगाबादपरिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम.मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी या पोलिस दलातील महत्वपूर्ण बदलाचा संक्षिप्त अहवाल महाराष्टÑाचे पोलिस महासंचालक, गृहविभागाला दिला आहे. केवळ सिस्टीम खराब आहे म्हणून चालणार नाही त्यासाठी सुधारणेचा प्रयत्न केला पाहिजे असे श्री. प्रसन्ना यांनी सांगितले.
रक्तदान हेच श्रेष्ठदान
रक्ताची गरज जगभरात वाढत आहे आणि गरजू लोकांचे जीवन वाचवण्यासाठी आपल्याला जीवनात किमान एकदा रक्तदान करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की रक्त देणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे आणि आपण दान केलेल्या रक्ताचे प्रमाण आपल्या शरीरात कमी कालावधीत पुन्हा निर्माण होते. म्हणून रक्तदान करणे टाळण्याचे कोणतेही कारण नाही.
पिंक मोबाईल पथक स्थापना
बीड जिल्ह्यात सहा ठिकाणी ' पिंक मोबाइल' पथकाची स्थापना -बीड,माजलगाव,आष्टी,गेवराई,केज, अंबाजोगाई या ठिकाणी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून सदरील पथकात महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पथकातील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांनी महिला अत्याचाराच्या विषयक प्रशिक्षण देण्यात आले असून त्यात महिलांच्या अडचणी आणि गुन्हे तपासाची प्रणाली बाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.
PINK MOBILE
महिला व मुलांवरील गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस गस कॉलेजेस महाविद्यालये व शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील. हे पथक महिलांवरील लैंगिक छळ, संध्याकाळची छेडछाड, बाल लैंगिक अत्याचार आणि नोकरदार महिलांना भेडसावनाऱ्या समस्यांबाबत जागरूकता वाढवेल. हे खेड्यांमध्ये समुपदेशन देखील घेईल.