Notification of Maharashtra Lockdown Order      

दिनांक 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार बीड जिल्हा अंतर्गत पासेस देण्यात येत होते. त्या पासेस सिस्टिमच्या पद्धतीमध्ये दि  04 /05 /2020 रोजी पासून खालील प्रमाणे  बदल करण्यात आले आहेत.

१) जे बीड जिल्ह्याचे रहिवासी आहेत आणि जे बाहेर जिल्ह्यात किंवा बाहेर राज्यात अडकून पडले आहेत, त्यांना परत बीड जिल्ह्यामध्ये येण्यासाठी व जे बाहेर  जिल्ह्यातील रहिवासी आहेत  किंवा बाहेर राज्यातील रहिवासी आहेत, जे बीड जिल्ह्यात अडकून पडलेले आहेत त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी  त्यांनी  covid19.mhpolice.in   या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. (संपर्क अधिकारी -   श्री श्रीकांत निळे, तहसीलदार, महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय बीड मोबाईल नंबर 95 52 46 32  77 )

२)  जिल्ह्यांतर्गत अत्यावश्यक सेवा व परवानगीकृत व्ययसाय यासाठी जी पास पद्धत  पोउपनि  श्री लोंढे हे पाहत होते त्यांचे ऐवजी  संपर्क अधिकारी -  श्री श्रीकांत निळे, तहसीलदार, महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय बीड मोबाईल नंबर 95 52 46 32  77 . हे काम पाहतील  व त्यासाठी  covid19.mhpolice.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.

 ३) मेडिकल इमर्जन्सी साठी, वैयक्तिक कारणासाठी, जिल्ह्याबाहेर जायचे असल्यास  त्यांचेसाठी जी पास पद्धत स पो नि खटकलं हे पाहत होते त्यांचे ऐवजी नायब तहसीलदार श्री धर्माधिकारी मोबाईल न. 9371547217   हे सकाळी १०.०० ते संध्याकाळी १०.०० वाजे पर्यंत व तहसीलदार श्री रत्नपारखी,  मोबाईल नंबर - 94 22 74 55 32 हे  रात्री  १०.०० ते सकाळी १०.००  च्या दरम्यान  हे काम पाहतील.

  उपरोक्त कारणांसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. यानंतर बीड जिल्हा पोलीस दल आपल्याला कोणतेही पास देणार नाही. तरी उपरोक्त संबंधित वेबसाईट व प्राधिकृत अधिकारी यांना  संपर्क  साधून आपण आपले पासेस प्राप्त  करावेत.

Welcome To Beed Police Website.

PUBLIC AWARENESS VIDEOS